मार्च २०२५ FIDE रेटिंग लिस्ट : विश्लेषण

१८ वा विश्वविजेता डी. गुकेश मार्च २०२५ च्या FIDE रेटिंग यादीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग आहे. आर. प्रज्ञानंदाने ८७ व्या टाटा स्टील मास्टर्स २०२५ मधील आपल्या शानदार कामगिरीमुळे तो १४ वरून सहाव्या स्थानी झेप घेतली. अरविंद चिदंबरम आणि लिओन ल्यूक मेंडोन्का यांनी बुंडेस्लिगा आणि वाएक आन झी येथे प्रत्येकी १.५ एलो रेटिंग गुण मिळवले. पेंटाला हरिकृष्ण यांनी विम्बल्डन ऑफ चेस या स्पर्धेमध्ये ८.६ एलो रेटिंग गुण मिळवून २७००+ क्लबमध्ये मुसंडी मारली. सध्या ७ भारतीय टॉप ३० मध्ये आहेत जो आजवरचा उच्चांकी आकडा आहे. कोनेरू हम्पीने FIDE मोनाको ग्रैंड प्रिक्स येथे आपले रेटिंग ४.६ गुणांनी वाढवले. वैशाली आर हिने टाटा स्टील चॅलेंजर्समध्ये ८.१ गुण मिळवून भारतिय क्रमवारीत आपले दुसरे स्थान परत मिळवले. फोटो: लेनार्ट ओट्स/टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा