FRESH BOOK TITLES IN THE SHOP

NEW ARRIVALS

Checkout Now!

Books

h2e महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा - ९ वर्षाखालील गट (दिवस दुसरा)

by Vivek Sohani - 28/05/2025

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व द हेरिटेजच्या सहकार्याने सोलापुर चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या “चॅम्पियन चषक” ९ वर्षाखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू मुंबईचा नोवा आय्यर, रायगडचा धीमन हेमांग, पुण्याचे हेयान रेड्डी, अनिश जवळकर, ठाण्याचा कथित शेलार, नागपूरचा रिधान अग्रवाल तसेच मुलींच्या गटात मुंबईची गिरीश पै, सन्मरी पॉल, पुण्याचे अदिना मोहंती, अन्वी हिंगे सोलापूरची पृथा ठोंबरे, नंदुरबारची भूमी ढगढाके या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंनी आकर्षक खेळत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत यजमान सोलापूरसह मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, पालघर, छ. संभाजीनगर आदी राज्यातील विविध जिल्ह्यातुन ३६ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूसह एकूण २०२ नामांकित खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदवला.



सहाव्या फेरीअखेर मुलात पुण्याचे हेयान, गोरांक्ष तर मुलीत मुंबईची गिरीशा आघाडीवर

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व द हेरिटेजच्या सहकार्याने सोलापुर चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या “चॅम्पियन चषक” ९ वर्षाखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू हेयान रेड्डी व गोरांक्ष खंडेलवाल सहाव्या फेरीअखेर साडेपाच गुणासह संयुक्तरीत्या आघाडी घेत सर्धेत चुरस निर्माण केली आहे. तसेच मुलीच्या गटात मुंबईची गिरीशा पै हिने सहा गुणांसह आघाडी घेत विजेतेपदाकडे वाटचाल सुरु ठेवलेली आहे. तर अनिश जवळकर, नोवा जुयल, इवान दुबे, युवेन झवेरी व लक्ष दिघे हे सर्वजण पाच गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत व मुलीत ऋत्वि हरपुडे, अन्वी हिंगे, डेलिया खैरनार संयुक्तपणे पाच गुणांसह द्वितीय स्थानावर तर सोलापूरचे पृथा ठोंबरे, संस्कृती व रीना जाधव हे साडेचार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

मुलींच्या गटातील पहिल्या बोर्डवरील खेळाडू

खुल्या गटातील पहिल्या बोर्डवरील खेळाडू

महाराष्ट्र राज्य निवड नऊ वर्षाखालील स्पर्धेचा हॉल

गांधीनगर येथील द हेरिटेज येथे आजपासून सुरु झालेल्या सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये पहिल्या पटावर पहिल्या पटावर पाचव्या फेरीअखेर पाच गुणांचा आघाडीवर असणाऱ्या युवेन झवेरी व गोरांक्ष खंडेलवाल यांच्यातील रंगतदार झालेल्या लढतीत मध्यपर्वात युवेनने केलेल्या चुकांचा गोरांक्षने अचूक फायदा घेत डावावर निर्णायक वर्चस्व राखले व शेवटी युवेनला डाव सोडण्यास भाग पाडले. पहिल्या पटावर गिरीशा पै व रीवा चरणकर (सातारा) यांच्यातील झालेल्या आकर्षक लढतीत गिरीशाने सुरुवातीपासूनच आक्रमक चाली खेळत डावावर वर्चस्व मिळवले व मध्यपर्वात वजीर, उंट व अश्वाच्या मदतीने रीवाच्या राजावर प्रखर हल्ला चढवत विजय संपादन केला.

स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रमुख पंच मुंबईचे आंतरराष्ट्रीय पंच संदेश नागरनाईक तर त्यांना सहायक वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे, शशिकांत मक्तेदार, वरिष्ठ राष्टीय पंच रोहिणी तुम्मा, युवराज पोगुल, भरत वडीशेरला, विजय पंगुडवाले, यश इंगळे, नवीना वडीशेरला काम पाहत आहेत.

पाचव्या फेरीअखेरचे महत्वाचे निकाल:

मुली: पृथा ठोंबरे वि. वि. प्रियाल शिखरे, संस्कृती जाधव वि. वि. आभा फाळके

मुले : आदित्य सिद्धार्थ बरोबरी दर्श राऊत, अन्वित गायकवाड पराभूत वि. कथीत शेलार




Contact Us